Thursday, 7 March 2019

गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यास केंद्रीय कॅबीनेटची मंजुरी



    
नवी दिल्ली,  :  महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देत आज केंद्रीय कॅबिनेटने गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यास आज मंजुरी दिली आहे.  
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देशभारातील नागरी व संरक्षण विभागाच्या परिसरात एकूण ५० केंद्रीय विद्यालय उभारण्यास आज मंजुरी देण्यात आली आहे. यात राज्यातील गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे.

 आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने राज्यशासनाने विविध पाऊले उचलली आहेत. जिल्हयात उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्या यासाठी केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. राज्यशासनाच्या या प्रस्तावाला आजच्या  केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत  मंजुरी देण्यात आली आहे.

 आजच्या बैठकीत आसाम(२), बिहार (२),  छत्तीसगड(२) , हरियाणा(३) , मध्यप्रदेश (५) , तामिळनाडू (४), त्रिपुरा(१),उत्तरप्रेदश(६),उत्तराखंड(२), पश्चिम बंगाल (२), झारखंड(३) ,कर्नाटक(२), केरळ(१),    राजस्थान(२), आंध्रप्रदेश(२), अरुणाचल प्रदेश(३) , हिमाचल प्रदे(१) ,जम्मू आणि काश्मीर (२), ओडिशा (४)  या राज्यांतील नागरी व संरक्षण  विभागाच्या परिसरात केंद्रीय विद्यालये उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 ही सर्व केंद्रीय विद्यालये प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यावर सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे.

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                      
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 92 / दिनांक  07.03.2019

No comments:

Post a Comment