नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे
योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत
अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित
कार्यक्रमात निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी शहीदांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र
सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र. 104 / दिनांक 23.03.2019
No comments:
Post a Comment