प्रगती मैदान येथील 'योगशाळा एक्सपोत'
सहभाग
नवी दिल्ली दि. 10 : औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील योगाश्रमाच्या
योगपटुंनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या 'योगशाळा एक्सपो' मध्ये
वैजापूर योगाश्रमाच्या 20 योगपटुंनी सहभाग घेतला असून आज यातील काही योगपटुंनी परिचय
केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत
केले. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेमध्ये योगशाळा एक्सपोतील सहभागा विषयी योगपटुंनी माहिती दिली.
नमो
गंगे ट्रस्ट, गाजीयाबाद यांच्यावतीने येथील प्रगती मैदानमध्ये दिनांक 10 ते 12 मे 2019 दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील
योगशाळा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. वैजापूर योगाश्रमाचे संस्थापक तथा
प्रख्यात नाडी व योग तज्ज्ञ डॉ. अशोक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 वर्षाची ऋतुजा गाडे आणि
92 वर्षांचे आदिनाथ येखंडे यांच्यासह 8 महिला व 12 पुरुष असे एकूण 20 योगपटू
या एक्सपोत सहभागी झाली आहेत.
या योगशाळा एक्सपोमध्ये योग विषय
स्पर्धा आयोजित करण्यात आली असून देशभरातील 900 योगपटुंनी यात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद,
जळगाव, सांगली या जिल्हयांमधून एकूण 35 योगपटू यात सहभागी
झाले आहेत. या स्पर्धेमध्ये योग प्रात्याक्षीक, लेखी व तोंडी परीक्षा, तसेच योगावर
आधारीत चित्रकला स्पर्धा आणि निबंध
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैजापूर
योगाश्रमाचे डॉ. अशोक सरोदे,औरंगाबाद येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
संचालक कार्यालयाचे सेवानिवृत्त लेखापाल विलास सरोदे, सुनिता सरोदे, डॉ.
अन्नासाहेब कदम, कैलास मतसागर, दत्तात्रय सोनवने या योगपटुंचा आज परिचय केंद्राच्या
भेटीत सहभाग होता.
000000
रितेश भुयार
/वृत्त वि.
क्र.119/
दिनांक १०.०५.२०१९
No comments:
Post a Comment