नवी दिल्ली दि.
21 : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28
वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी'
दिन म्हणून मंगळवारी
महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात पाळण्यात आला .
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी माजी
प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री. सहाय यांनी
उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली.
सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा,
विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व
हिंसाचार विरोधी'
दिनाचे आयोजन
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व
हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या
प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. जनसंपर्क
अधिकारी अमरज्योतकौर अरोरा ,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment