Thursday, 30 May 2019

खासदार परिचय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन






                       सुबक मांडणीसह पुस्तिका तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल कौतुक 

नवी दिल्ली दि. 30 :  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदनात करण्यात आले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदरांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तिकेचे अवलोकन केले. सुबक मांडणी, उपयुक्त माहिती या पुस्तिकेत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य शपथ घेत असताना अगदी औचित्यपूर्ण समयी तत्परतेने ही पुस्तिका तयार केली आहे, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी कौतुक केले. 

मुख्यमंत्री कक्षात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळयात महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते. 
 
या खासदार परिचय पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभेवर निवडून आलेले  ४८ खासदार, राज्यसभेतील १९  व राष्ट्रपती महोदयांनी मनोनीत केलेले २ अशा एकूण ६९ खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे. लोकसभेतील खासदारांची माहिती लोकसभा मतदार संघानुसार देण्यात आली असून खासदार महोदयांचा पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, व्टिटर हँडल व स्वीयसहायकाचा भ्रमणध्वनी देण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार महोदयांची माहिती इंग्रजी वर्णमालेनुसार देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार महोदयांच्या कालावधीसह उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे खास वैशिष्टय म्हणजे यात प्रत्येक पानावर संबंधीत खासदार महोदयांची माहिती संकलीत असलेला क्युआर कोड देण्यात आला आहे. 
                                               000000  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi
 000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.122/  दिनांक  ३०.०५.२०१९ 


No comments:

Post a Comment