नवी दिल्ली दि. 26:
समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य
करणारे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित
महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षी शाहू
महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी माजी आमदार
शिवराज तोंडचिरकर, ज्येष्ठ पत्रकार राम हाडोळे, महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्यौत कौर अरोरा यांच्यासह कार्यालयात उपस्थित
अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
अमरज्योत
कौर अरोरा /वृत्त वि. क्र.१४३ /
दिनांक २६.०६.२०१९
No comments:
Post a Comment