नवी दिल्ली, 19 :
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्दी
पत्रक काढून ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार
संघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त
होणाऱ्या जागेसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै 2019 रोजी
जारी होईल. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची
छाननी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5
ऑगस्ट 2019 आहे. निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00
या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑगस्ट 2019 रोजी होईल.
औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज पासून
तत्काळप्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.164 / दिनांक 19.०७.२०१९
No comments:
Post a Comment