दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ
नवी दिल्ली, 25 : महाराष्ट्रात प्रशासकीयसोयीसाठी
आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे समजल्या
जाणा-या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 415 आणि भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस
)317 अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत.
गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 2016
ते 2018 या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिका-यांच्यापदांमध्ये
लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिका-यांची संख्या 361 हून वाढून 415 झाली
आहे तर आयपीएस अधिका-यांची संख्या 302 हून
वाढून 317 झाली आहे. प्रधानमंत्री
कार्यालय तथा कर्मचारी ,जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ.
जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली .
केंद्र
शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या
देशातील आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत
वर्ष 2016 ते 2018 दरम्यान देशातील एकूण 10 राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या
राज्यांमध्ये एकूण 2 हजार710 आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील
आयएएस अधिका-यांच्या संख्येत 361 हून 415 एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे.
वर्ष
2016 ते 2018 दरम्यान केंद्रीय गृह
मंत्रालयासह देशातील एकूण 13 राज्यांमधील आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा
घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 277 आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये
महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत 302 हून 317 एवढी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.167 / दिनांक
25.०७.२०१९
No comments:
Post a Comment