Thursday, 11 July 2019

‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून’ महाराष्ट्रात ८९ हजार रोजगार














नवी दिल्ली दि. 11 : ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ (पीएमईजीपी) गेल्या तीन वर्षात देशभरात 13 लाख 82 हजार 440 बेरोजगारांना काम मिळाले आहे तर, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली मध्ये 89 हजार 567 जणांना रोजगार मिळाला आहे.

            सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणा-या ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’  महाराष्ट्र राज्याचा दादरा व नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशासह आणि गुजरात राज्याचा दिव व दमन या केंद्रशासीत प्रदेशासह  देशातील 25 राज्य आणि 5 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये 2016-2017 , 2017-2018 आणि  2018-2019  या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या रोजगार निर्मितीची माहिती सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी  यांनी लोकसभेत लिखीत उत्तरात दिली.

                                     महाराष्ट्र, दादरा-नगर हवेलीत 89 हजार 567 रोजगार

            महाराष्ट्र व दादरा नगर हवेली मध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 65 हजार 872  रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेची उत्तम अंमलबजावणी होऊन इच्छित लक्षापेक्षा अधीक म्हणजे 89 हजार 567  एवढी रोजगार निर्मिती झाली आहे.  वर्ष 2016-2017  मध्ये 17 हजार 799 , वर्ष 2017-2018  मध्ये 26 हजार 632 तर  वर्ष 2018-2019          मध्ये45 हजार 136  रोजगार निर्मिती झाली.
            देशात ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 14 लाख 83 हजार 808  रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. यापैकी 13 लाख 82 हजार 440  एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. देशात अनुक्रमे वर्ष 2016-2017  मध्ये 4 लाख 7 हजार 840 , वर्ष 2017-2018  मध्ये 3 लाख 87 हजार 184  तर वर्ष 2018-2019  मध्ये 5 लाख 87 हजार 416  रोजगार निर्मिती झाली आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic                                              000000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.153 /  दिनांक  11.०७.२०१९ 

No comments:

Post a Comment