Thursday 18 July 2019

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण
















नवी दिल्ली दि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले.
            निती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया शेजारी रूद्राक्षाच्या रोपटयाची लागवड केली. यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय आणि सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 1 जुलै 2019 रोजी चंद्रपूर जिल्हयातील वरोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहिम -2019’चे उद्घाटन केले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 12 जुलै 2019 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर तसेच राज्यातील खासदारांनी यात सक्रीय सहभाग घेतला होता .
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic                                              000000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.163 /  दिनांक  18.०७.२०१९ 


No comments:

Post a Comment