नवी दिल्ली दि. 1: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि
महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित
महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर ,अजीतसिंह नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी
अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन
तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित
अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व
कर्मचारी, पत्रकार आणि अभ्यागत यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.१७२ /
दिनांक १.०८.२०१९
No comments:
Post a Comment