नवी
दिल्ली, 8 : ‘छोडोभारत’, ‘गोवा मुक्तीसंग्राम’ आणि ‘हेद्राबाद
मुक्ती संग्रामात’ जिवाची बाजी लावून ब्रिटीश सत्ते विरोधात बंड
पुकारणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला
सुवर्ण दिवस प्राप्त झाले असे गौरवोद्गगार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
मंत्री अरविंद सावंत यांनी आज काढले.
क्रांतीदिनी महाराष्ट्रातील
स्वातंत्र्य सग्राम सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय
मंत्री श्री सावंत यांनी
आज महाराष्ट्र सदनात या स्वातंत्र्यसैनिकांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अनौपचारीक गप्पाही
मारल्या. यावेळी श्री. सावंत यांनी उपस्थित
स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस
केली. ‘छोडोभारत’,
‘गोवा मुक्तीसंग्राम’ आणि ‘हेद्राबाद मुक्ती संग्रामात’ दिलेल्या योगदानाबाबत या
स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाबाबत त्यांच्याच शब्दात जाणून घेतले.
मुंबई दक्षिण –मध्य लोकसभा मतदार संघाचे खासदार
राहुल शेवाळे, अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू,
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.
भारतदेश पारतंत्र्यात असताना
ब्रिटीश सत्ते विरोधात बंड पुकारणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या
त्यागाचे महत्व अनन्यसाधारण असल्याच्या भावना श्री. सावंत यांनी व्यक्त केल्या. जिवाची बाजी लावून ब्रिटीशांविरोधात बंड पुकारणा-या स्वातंत्र्य
संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले असेही श्री.
सावंत म्हणाले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या लॉबीमध्ये
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर श्री. सावंत
यांनी ‘भारत माता की जय’ असा जय घोष दिला
त्यामुळे देशभक्तीमय वातावरण झाले.
यावेळी भंडारा जिल्हयातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्हयातील रतनचंद जैन, परभणी जिल्हयातील माधवराव
कुलकर्णी, औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे, लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे,
वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्हयातील बन्सी जाधव या स्वातंत्र
संग्राम सैनिकांचा सत्कार श्री. सावंत यांनी केला.
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१८१ / दिनांक ८.०८.२०१९
No comments:
Post a Comment