9 नोव्हेंबरला पुरस्कार वितरण
नवी
दिल्ली,दि.8 : देशातील
प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय
उद्योजकता पुरस्कार-2019’ चे लोकार्पण केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते आज झाले. मंत्रालयाच्या स्थापनादिनी यावर्षी 9
नोव्हेंबर ला पुरस्कारांचे वितरण होणार
आहे.
येथील
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता
मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार-2019’ चे
लोकार्पण झाले. विभागाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव सुनिता संगी आणि
ज्योत्सना सिटलींग यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
10 सप्टेंबर पर्यंत करता
येणार अर्ज
आज पासून या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यास
विधीवत सुरुवात झाली असून 10 सप्टेंबर 2019 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. मंत्रालयाच्या
www.neas.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या विहित
नमुण्यात या पुरस्कारासाठी अर्ज भरता येणार आहे. पुरस्कारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे.
दोन श्रेणीत एकूण 45
पुरस्कार
या पुरस्कारांना ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन
श्रेणींमध्ये विभागण्यात आले असून एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अ श्रेणीमध्ये तीन उप श्रेणी करण्यात आल्या
असून प्रत्येक श्रेणीत 13 असे एकूण 39 पुरस्कार देण्यात येणार आहे. या अंतर्गत
‘अ1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांना
अर्ज करता येणार आहे. ‘अ2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखा पर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांना अर्ज करता येणार
आहे. तर ‘अ3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटी पर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणा-या
उद्योजकांना अर्ज करता येणार आहे. कापड, कापड सामुग्री, चर्मा व संबंधीत वस्तू,
शेती, अन्न प्रक्रिया, वनोत्पादन, खाद्य वस्तू आदी 13 उद्योग क्षेत्रांचा यात
समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत महिला व दिव्यांग उद्योजकांना विशेष पुरस्कार
देण्यात येणार आहे.
‘ब’
श्रेणी अंतर्गत पर्यावरण पुरक वस्तू
निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
व्यक्तीगत
विजेत्याला 5 लाख रुपये, चषक आणि प्रशस्ती पत्र पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार
आहे. तर विजेत्या संस्थेला 10 लाख रुपये,
चषक आणि प्रशस्ती पत्र पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. 2016 पासून ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारांची’ सुरुवात झाली आहे.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.१८१ /
दिनांक ८.०८.२०१९
No comments:
Post a Comment