देशातील प्रत्येकी 15 सरकारी व खाजगी शैक्षणिक संस्थांची शिफारस
नवी
दिल्ली दि. 3 : विद्यापीठ
अनुदान आयोगाने(युजीसी) ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे’ ला प्रतिष्ठित संस्थेचा
दर्जा देण्याची शिफारस केली आहे. आधीच प्रतिष्ठित
संस्थेचा दर्जा जाहीर झालेली ‘आयआयटी बॉम्बे’ शिफारस करण्यात आलेल्या देशातील 15 सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध निकषांच्या
आधारे देशातील शैक्षणिक संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा देण्याची योजना आखली
आहे. याअंतर्गत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली
नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय सक्षम तज्ज्ञ
समितीने शुक्रवारी पार पडलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 542 व्या बैठकीत देशातील15
सरकारी आणि 15 खाजगी अशा एकूण 30 शैक्षणिक संस्थाची शिफारस प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा देण्यासाठी केली
आहे. केंद्रशासनाकडून प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा योजनेंतर्गत 10 सरकारी व 10
खाजगी संस्थांना मान्यता दिली असून युजीसीने 15 सरकारी आणि 15 खाजगी संस्थांची
शिफारस केली आहे.
सरकारी
संस्थांमध्ये महाराष्ट्रातील दोन तर खाजगी संस्थांमध्ये एका संस्थेचा समावेश
सक्षम समितीने दिलेल्या सरकारी
संस्थांच्या यादी मध्ये महाराष्ट्रातील दोन शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यात,आयआयटी
बॉम्बे प्रथम स्थानावर असून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 11 व्या स्थानावर
आहे. तसेच, आयआयटी बॉम्बे संस्थेला भारत सरकारने याआधीच प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा
बहाल केला आहे.
‘शैक्षणिक संस्थांच्या जागतिक
क्रमावारी वर्ष-2020’ मध्ये आयआयटी बॉम्बे 152 स्थानावर तर ‘भारत सरकारची शैक्षणिक
संस्था क्रमावारी वर्ष-2019’ मध्ये पहिल्या स्थानावर राहीली आहे. ‘जागतिक
क्रमावारी वर्ष -2020’ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 801 ते 1000
दरम्यानच्या स्थानावर आहे. तर ‘भारत
सरकारची शैक्षणिक संस्था क्रमावारी वर्ष-2019’
मध्ये पुणे विद्यापीठ 19 व्या स्थानावर राहीले आहे
देशातील 15 खाजगी शैक्षणीक संस्थांची
शिफारस प्रतिष्ठित संस्थांसाठी करण्यात आली असून महाराष्ट्रातील रिलायंस
फॉऊंडेशनच्या जिओ संस्थेचा यात समावेश आहे. 15 संस्थांच्या यादी मध्ये या संस्थेला
तिस-या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले असून या संस्थेची प्रतिष्ठित संस्था म्हणून या
आधीच निवड झाली आहे.
शिफारस
करण्यात आलेल्या देशातील 15 सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये क्रमश: आयआयटी बॉम्बे, आयआयटी
दिल्ली, आयआयएससी (अभिमत विद्यापीठ), आयआयटी मद्रास, आयआयटी खडकपूर, दिल्ली
विद्यापीठ (केंद्रीय विद्यापीठ), हैद्राबाद विद्यापीठ( हैद्राबाद केंद्रीय
विद्यापीठ), जाधवपूर विद्यापीठ ,कोलकत्ता, अण्णा विद्यापीठ चैन्नई, बीएचयु वाराणसी
(केंद्रीय विद्यापीठ), सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, एमयु अलीगड(केंद्रीय
विद्यापीठ),तेजपूर विद्यापीठ (केंद्रीय विद्यापीठ), पंजाब विद्यापीठ
चंदिगड(केंद्रीय विद्यापीठ), आंध्र विद्यापीठ विशाखापट्टणम चा समावेश आहे.
शिफारस करण्यात आलेल्या
देशातील 15 खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये क्रमश: बिट्स पिलानी-राजस्थान, मनिपाल
अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन,जीओ इंस्टिटयूट (रिलायंस फाउंडेशन महाराष्ट्र), अम्रीता
विश्वविद्यापीठ-बँग्लोर, व्हिआयटी व्हेल्लोर-तामीळनाडु, जामीया हमदर्द -नवी
दिल्ली, कलिंगा इंस्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी-भुवनेश्वर,ओ.पी.जिंदाल विद्यापीठ-हरियाणा,
शिव नादर विद्यापीठ- उत्तर प्रदेश, भारती (सत्यभारती फाउंडेशन) दिल्ली, अझीम
प्रेमजी विद्यापीठ-बॅंग्लोर, अशोक विद्यापीठ सोनिपत-हरियाणा, केआरइए विद्यापीठ
(आयएफएमआर)-चैन्नई तामीळनाडू, आयआयएचएस –बँग्लोर आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक
हेल्थ-गांधी नगर यांचा समावेश आहे.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.१७७ /
दिनांक ३.०८.२०१९
No comments:
Post a Comment