नवी
दिल्ली,दि.6: ‘भारत छोडोआंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती’ आंदोलनात मोलाचे योगदान
देणा-या महाराष्ट्रातील 9 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
हस्ते शुक्रवारी क्रांति दिनी राष्ट्रपती भवनात सन्मान होणार आहे.
9,ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, यासोबतच देशभरात ब्रिटींशांना हाकलून
लावण्यासाठी झालेल्या विविध आंदोलनात
सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी राष्ट्रपती भवनात सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो.
शुक्रवारी
सन्मान होणा-या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्हयातील भिवाजी
अंबुले, नागपूर जिल्ह्यातील रतनचंद
जैन, परभणी जिल्ह्यातील माधवराव कुलकर्णी , बुलडाणा जिल्हयातील नारायण खेळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील
दत्तात्रय मोरे, औरंगाबाद जिल्हयातील
लक्ष्मण उखडे, लातूर जिल्हयातील शिवलींगप्पा
इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मडगे, वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि
बीड जिल्हयातील बन्सी जाधव या स्वातंत्र्य
सैनिकांचा सन्मान होणार आहे.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.१७८ /
दिनांक ६.०८.२०१९
No comments:
Post a Comment