नवी दिल्ली,
24 : राज्यातील सातारा
लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला पोट निवडणूक घेण्यात
येणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या
राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून
राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.
असा असणार पोट निवडणुकीचा
कार्यक्रम
सातारा
लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला
निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून
5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होईल.
7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल. 27 ऑक्टोबरला पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
*****
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.220 / दि.24.09.2019
No comments:
Post a Comment