नवी दिल्ली, 14 : राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ उत्तम पाचारणे यांनी
आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी डॉ. पाचारणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्री कांबळे यांनी अहमदनगर
येथील तरूण चित्रकार प्रणीता बोरा यांचेही पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. परिचय केंद्राचे
उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या अनौपचारीक गप्पांमध्ये
डॉ. पाचारणे यांनी राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून
राबविलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच, राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या
माध्यमातून राष्ट्रपती भवनात सद्या सुरु असलेल्या देशातील जेष्ठ व नामवंत चित्रकार
आणि तरूण चित्रकारांच्या निवासी शिबीराबाबतही
डॉ. पाचारणे यांनी यावेळी माहिती दिली.
डॉ. पाचारणे यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान
व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा :
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.२४९ /
दिनांक १४.११.२०१९
No comments:
Post a Comment