नवी दिल्ली, 15 : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती आज महाराष्ट्र सदन
व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात
आली.
कोपर्निकस
मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय
यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी सहायक
निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी बिरसा
मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात बिरसा मुंडा यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प
अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा :
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र.२५० / दिनांक १५.११.२०१९
No comments:
Post a Comment