नवी दिल्ली, 20 : नमन,गण-गौळण,लावणी,भारूड, कोळीनृत्य या महाराष्ट्रातील समृध्दलोककलांच्या बहारदार सादरीकरणाने आज प्रगतीमैदान येथील महाराष्ट्र दिन कार्यक्रमात राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शनघडले आणि या कार्यक्रमाने उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मने जिकंली.
येथील प्रगतीमैदानावर 39 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आज भारतीयसांस्कृतिक संबंध परिषदेचेअध्यक्ष तथा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रदिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्रीअरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे ,महाराष्ट्र सदनाचे निवासीआयुक्त समीर सहाय आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.
भारतीयआंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात दररोज सायंकाळी ‘हंसध्वनी सभागृह’ येथे व्यापार मेळयात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेसादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळयाच्या सातव्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राच्यासांस्कृतिक वारशाचे बहारदार सादरीकरण
मुंबई येथील ‘'पृथ्वीइनोव्हेशन्स’ गृपच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्रदिन कार्यक्रमाचे’ सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेचपंढरपुरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेटप्रेक्षकांमधून निघालेली वारक-यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीलामानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्यासादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या.
‘बाजाराला विकण्या निघाली दही दूध,तूप आणि लोणी...’ ही ग्रामीण बाज दर्शविणारी गौळण, ‘वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजापंढरीचा..’ हा भक्तीरसाने ओतप्रोत अभंग, ठाकर या आदिवासी जमातीचे सांस्कृतिक वैभव दर्शविणारे ‘लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला….’ या गितांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य,कोळी नृत्य, वाघ्या-मुरळी, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनीरसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबचउभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटरहॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi 000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.254/ दिनांक २०.११.२०१९
No comments:
Post a Comment