Wednesday, 15 January 2020

चुकीच्याशब्दांचा वापर टाळावा – भाषातज्ज्ञ नंदनवार मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप











नवी दिल्ली, १५ : मराठी भाषा लिहितांना व बोलतांना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे येागदान ठरेल, अशा भावना भाषातज्ज्ञ प्रा. भास्करनंदनवार यांनी आज येथे व्यक्त केल्या. महाराष्ट्र सदन आणिमहाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने १ ते १५ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित ‘मराठीभाषा संवर्धन पंधरवडयाच्या समारोप कार्यक्रमात प्रा. नंदनवार बोलत होते. मराठी भाषासंवर्धनात उल्लेखनीय योगदानासाठी निवासी आयुक्त समीर सहाय आणि गुंतवणूक वराजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल यांच्या हस्ते दिल्लीतील व्यक्ती व संस्थांचा यावेळीसत्कार करण्यात आला. पंधरवडया दरम्यान घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर आणि निबंधस्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रीयस्नेहसंवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष विजय महादाणी, वनीता समाजाच्या अध्यक्ष नीलिमा चिमलवार, नूतन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा बापट, चौगुले पब्लिक स्कुलच्यामुख्याध्यापिका पूजा साल्पेकर, भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर नंदनवार आणिज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.सत्कारानंतर बोलताना भाषातज्ज्ञ प्रा. भास्करनंदनवार म्हणाले, भाषाशास्त्राचाप्राध्यापक म्हणून गेली ३३ वर्ष काम केले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून दै.लोकमतमध्ये मराठी भाषेतील विविध शब्दांची व्युत्पती , नवीन शब्दार्थ किंवा प्रचलीत शब्दाबदल्‍ माहिती सांगणारे सदर लिहित आहे. हे सर्व कार्य करीत असताना मराठी भाषा बोलतांना व लिहितांना होत असलेल्या दुर्लक्षाकडे त्यांनीउपस्थितांचे लक्ष वेधून विविध उदाहरणे दिली. चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनातप्रत्येकाचे येागदान ठरेल असे ते म्हणाले. महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज संस्थेचेअध्यक्ष विजय महादाणी म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती,पंरपंराजपण्यासाठी व राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत२३ डिसेंबर १९१९ रोजी या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या या संस्थेने यावर्षी शताब्दी वर्ष साजरे केले. ग.वा. मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलरावगाडगीळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.दिल्लीत येणा-या महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी याउद्देशाने संस्थेने १९५१ मध्ये पहाडगंज भागात ‘दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट’ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र हे अतिथीगृह उभारल्याचे त्यांनी सांगितले.वनिता समाजाच्याअध्यक्ष नीलिमा चिमलवार म्हणाल्या, दिल्लीतील मराठी महिलांनी एकत्र येत वनिता समाजाची स्थापना केली. या संस्थेला ७० वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्थेच्यावतीने बालवाडी चालविण्यात येते. संस्थेचे स्वतंत्र ग्रंथालयअसून १० हजरांहून अधिक मराठी पुस्तक याठिकाणी उपलब्ध आहेत. दर महिन्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेचवर्षातून एकदा वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असे चिमलवार यांनी सांगितले.
नूतन मराठी शाळेच्यामुख्याध्यापिका शुभदा बापट म्हणाल्या, व्यवसायव नोकरी निमित्त दिल्लीत निवासीअसलेल्या मराठीजणांना आपल्यापाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून ‘महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिकसंस्थेची’ स्थापना करून पहाडगंज भागात १९२९ मध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेचीस्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्याविद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण,प्रसिध्द कलाकार उत्तरा बावकर, प्रसिध्द उद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदीअधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. चौगुले पब्लिकस्कुलच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर म्हणाल्या, १९५६ मध्ये करोलबाग येथे एका गॅरेज मध्ये या शाळेची सुरवात झाली. पुढे मराठी लोकांनी करोलबागेतच जागा विकत घेवून शिशुविहारनावाची शाळा सुरु केली. चौगुले शिपिंग कॉपोंरेशनच्या माध्यमातून याशाळेची वाटचाल होवून १९९८ पासून चौगुलेपब्लिक स्कूल नावाने ही शाळा नावारुपालाआली. शाळेमध्ये ८ वी पर्यंत मराठी हाविषय अनिवार्य आहे . मराठी व अमराठी विद्यार्थी हा विषय आनंदानेशिकतात. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणतंत्र दिनी राजपथावर होणा-यापथसंचलनात सहभाग घेवून मराठीची पताका उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांनी पत्रकारितेतील त्यांचा प्रवासव दिल्लीतील पत्रकारितेचा अनुभव कथन केला.पत्रकारिता करताना दिल्लीच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचा अनुभव घेता आला, त्याचे वार्तांकन करताआले. त्या म्हणाल्या, माझे आजोबा काकासाहेब लिमये हे प्रसिध्द मराठी वृत्तपत्र ज्ञानप्रकाशचे दीर्घकाळसंपादक राहिले असून यांच्या प्रेरणेनेच पत्रकारीतेत आले . आई , आजी आणि पती यांनी या क्षेत्रात कार्य करण्यासाठी सततप्रोत्सहान दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक वराजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्रपरिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेशभुयार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. निबंध स्पर्धेत डॉ. गवई तर सुंदर हस्ताक्षरात विशाल कदम पहिलेमराठी भाषा संवर्धन पंधरवडयात २ जानेवरी रोजी ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’तर ४ जानेवारीला ‘निबंध स्पर्धा’ घेण्यातआली. ‘मराठी भाषा संवर्धनात माझे योगदान’ या विषयावरील स्पर्धेसाठी केंद्र शासनात कार्यरत डॉ. मनीष गवई यांना पहिल्या तर महाराष्ट्र सदनाचे स्वगात अधिकारीप्रमोद कोलापटे यांना दुस-या क्रमांकाचेरोख बक्षीस प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षाअधिकारी अनिल चोरगे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. सुदंर हस्ताक्षर स्पर्धेत महाराष्ट्र सुरक्षाबलाचे विशाल कदम, हेमंत राठोड आणि अविनाश राठोड यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले.यावेळी अविनाश राठोड यांना बक्षीस प्रदानकरण्यात आले..
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचयकेंद्राच्यावतीने १ते १५ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र सदनात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजराकरण्यात आला. पंधरवड्याचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते झाले. पंधरवड्या दरम्यान दररोज फलकावर दर्शनी भागात मराठी सुभाषिते लिहिण्यातआली तसेच दिवाळी अंकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यातआल्या. मराठी पत्रकार दिनाचे आयोजन करुनज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. ‘तुकाराम’ हा मराठी चित्रपट दाखविण्यातआला. मराठी काव्यवाचन झाले. आज यापंधरवड्याचा समारोप झाला.

No comments:

Post a Comment