नवी दिल्ली, ३०
: देशाच्या
स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन
(स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना
आदरांजली वाहण्यात आली.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी
आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी
उपस्थित होते.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना
मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह
कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र. 23 /दि.30.01.2020
No comments:
Post a Comment