नवी दिल्ली, 4 : महाराष्ट्रातील 10 स्वयंचलित वाहन
तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 296.02 कोटी
रूपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला
आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ॲङ अनिल परब यांनी आज येथे दिली.
येथील परिवहन भवन येथे केंद्रीय परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांची आज श्री परब यांनी भेट घेतली. या बैठकीत राज्य
शासनातर्फे 10 स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण(AVI&C) केंद्रासाठी 139.80 कोटी तर 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक (ADTT) साठी 156.22 कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय
मंत्री श्री गडकरी यांनी मान्यता दिली, असल्याचे बैठकीनंतर श्री परब यांनी
सांगितले.
पहिल्या
टप्प्यात 10 स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र
महाराष्ट्रात
प्रथम टप्प्यात राज्यातील विविध भागात 10 स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र
उभारली जातील. ही केंद्र कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे (कल्याण), नागपूर
(ग्रामीण), मुंबई (सेंट्रल), हिंगणघाट (नागपूर), पनवेल, दिवेघाट (पुणे), नांदेड या
ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील
विविध भागात एकूण 50 वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारली जाणार आहेत.
त्यापैकी 10 केंद्रा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन
ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडून तांत्रिक सहायता घेतली जाणार आहे. यापैकी मुंबई ईस्ट-कुर्ला येथे महाराष्ट्र राज्य रस्ते
वाहतुक मंडळाच्या जागेवर बांधकाम सुरू
असल्याचेही श्री परब यांनी सांगितले. नाशिक
येथे पथदर्शी प्रकल्पातंर्गत स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र 2015
मध्ये सुरू करण्यात आलेले आहे.
22 मानवरहित
‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’
राज्यात 22 ठिकाणी मानवरहित ‘स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक’ सुरू करण्यात येणार
असून यासाठी 156.22 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. हे ट्रॅक संपूर्ण संगणकीकृत
राहतील. यासंदर्भात सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रांसपोर्ट यांना प्रस्ताव
पाठविला असल्याचे श्री परब यांनी सांगितले. राज्य परिवहन आयुक्त शेखर चेन्ने या
बैठकीस उपस्थित होते
No comments:
Post a Comment