Tuesday 25 February 2020

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक




नवी दिल्ली, 25 : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे.
            संसदेचे स्थायी सभागृह असणा-या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये  संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

          असा असणार निवडणूक कार्यक्रम

             महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26  मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर  26 मार्च ला सकाळी 9 ते  दुपारी  4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता  मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.42 / दि.25.02.2020



No comments:

Post a Comment