Friday, 7 February 2020

राजधानीत ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन










                  

नवी दिल्ली, 7 : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्यावतीने  14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती  शिवाजी  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
            ‘छत्रपती  शिवाजी महोत्सवातवैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून हे सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गवरील मावळणकर सभागृह आणि डेप्युटी स्पीकर सभागृहात करण्यात येणार आहे.
                                           प्रसिध्द नाटक  ‘जाग उठा है रायगढचे सादरीकरण

        प्रसिध्द नाटककार वसंत कानेटकर लिखीत लोकप्रिय ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येतेया नाटकाचे हिंदी रुपांतरीतजाग उठा है रायगढ हे नाटक महोत्सवाच्या आरंभीच 14 फेब्रुवारी रोजी सायं.6.30 वा. सादर होणार आहे. ‘जाग उठा है रायगढहे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त नाटक असून पुणे येथील स्वतंत्र कला ग्रुपची निर्मिती आहे. या नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत चौधरी तर निर्माते युवराज शाह आहेत.
   महोत्सवामध्ये  17 फेब्रुवारी रोजी दिल्ली स्थित शिवाजी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन तथा  विजेत्यांना  खासदार मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

21 फेब्रुवारीशिवप्रतिमेला पुष्पार्पण  
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिनी  21 फेब्रुवारी  रोजी  सकाळी 10 वाजता येथील मिंटो रोड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला मान्यवरांच्या हस्ते  पुष्पार्पण करण्यात येणार आहे.   
   20 फेब्रुवारीला   सायंकाळी 6.30 ते 8.00 दरम्यान येथील डेप्युटी स्पीकर सभागृहात  दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिरूध्द देशपांडे यांचेशिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवरव्याख्यान होणार आहे.


           
                       ‘शिव गौरव गाथासंगीतमय कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता
छत्रपती  शिवाजी महाराजांच्या गौरवगीतांवर आधारीतशिव  गौरव गाथाया संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन  21 फेब्रुवारी  रोजी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार असून याच कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रसिध्द गायक संगीतदिग्दर्शक अजीत परब, गायक मयुर सुकळे, गायिका केतकी भावे -जोशी आणि  शाल्मली सुखटनकर  ही संगीतमय प्रस्तुती देतील .
                  आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                        00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.28/दि.7.02.2020



No comments:

Post a Comment