नवी दिल्ली, 1 : समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी आणि डॉ राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment