नवी दिल्ली,1 : भारतीय प्रशासन सेवेतील वरीष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांनी आज कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव पदाचा पदभार स्वीकारला.
श्री. चंद्र हे महाराष्ट्र कॅडरच्या 1988 तुकडीतील अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्येही श्री चंद्र प्रतिनियुक्तीवर होते. 2013-17 ते दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून महत्वाची जबाबदारी श्री चंद्र यांनी बजावली.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर/वृ. क्रं, 89/01/10/2020
No comments:
Post a Comment