नवी दिल्ली, दि. २३ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे हे २४ मार्च २०२१ रोजी ‘बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर सहावे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २४ मार्च रोजी व्याख्यानमालेच्या सहाव्या दिवशी प्रभाकर ढगे सायंकाळी ५ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
प्रभाकर ढगे यांच्या विषयी
श्री ढगे हे सद्या दै. नित्य समयच्या गोवा आवृत्तीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक पुढारीच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चिफ ते कार्यकारी संपादक असा १४ वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुळचे औरंगाबाद येथील श्री. ढगे , संज्ञापन व वृत्तपत्रविद्येची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात रुळले. प्रारंभी त्यांनी दैनिक अजिंठा (औरंगाबाद) वृत्तपत्रात उपसंपादक पदावर कार्य केले. यानंतर त्यांनी गोवा कार्यक्षेत्र निवडले येथे दै.वर्तमान, दै. गोमंतक,दै. गोवन वार्ता या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे . गोवा आणि महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात पत्रकारिता विषयाचे अध्यापन कार्यही ते करीत आहे.
श्री ढगे हे उत्तम लेखक आहेत. ‘मनमोर’ हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह, ‘बापाची शाळा’ हा कथा संग्रह, ‘पत्रकारितेतील सियाचीन शिख’ हा लेख संग्रह, ‘माध्यम मानस’ हे पत्रकारितेवरील पुस्तक, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ हा लेख संग्रह प्रसिध्द आहे. ‘सुखी माणसांचा देश भूतान’ हे प्रवास वर्णनही प्रसिध्द झाले आहे. ‘डॉ.भाई कुडचडकर गौरवग्रंथ’, ‘वन मॅन आर्मी’ आदी ग्रंथांचे त्यांनी संपादनही केले आहे.
गुरुवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
गुरुवार 24 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता परिचय केंद्राच्या
अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब
चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ
घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान
परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया
ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता
येणार आहे.
आमच्या ट्विटर
हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
िरितेश भुयार /वृत्त वि. क्र.५७ /दिनांक २३.०३.२०२१
No comments:
Post a Comment