नवी
दिल्ली, २३ : भारतीय स्वातंत्र्य
लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद
दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात यावेळी अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांनी शहीदांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात शहीदांना अभिवादन
स्वातंत्र्य लढयात
प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय
केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक
रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन
केले.
No comments:
Post a Comment