Wednesday 31 March 2021

‘महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान’ या विषयावर डॉ.मेधा कुळकर्णी यांचे व्याख्यान



हीरक महोत्सव व्याख्यानमालेत

नवी दिल्ली, दि. 31 : महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या डॉ. मेधा कुळकर्णी या महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या 1 एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान या विषयावर 14 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. 1 एप्रिल   रोजी या व्याख्यानमालेच्या चौदाव्या दिवशी डॉ.मेधा कुळकर्णी  दुपारी 4.०० वाजता महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान या विषयावर विचार मांडणार आहेत.

 

डॉ. मेधा कुळकर्णी यांच्या विषयी

डॉ. मेधा कुळकर्णी या संपर्क या सामाजिक संस्थेच्या संस्थाप‍िका आहेत. उपेक्षितांच्या समस्या, अडचणी प्रसारमाध्यमांतून मांडणे आणि ते धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्या करतात. सामाजिक कार्यकर्त्यांना माध्यमाविषयी मार्गदर्शन करतात. संपर्कसंस्थेच्यावतीने नवी उमेद असा उपक्रम चालविला जातो.  

  त्या आकाशवाणीमध्ये कार्यरत होत्या. आकाशवाणीतील सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रमात नवनवे प्रयोग त्यांनी केले.  स्थळकाळ आकाशवाणी, पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची आणि लढे आणि तिथे या  पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.

 

 

 

 

गुरूवारी समाज माध्यमांहून  व्याख्यान प्रसारण

 

         बुधवार 1 एप्रिल 2021 रोजी  सायंकाळी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

   


No comments:

Post a Comment