महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. १९ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन
व्याख्यानमालेत’ २१ मार्च २०२१ रोजी पद्मश्री पुरस्कार प्राप्त खासदार तथा ज्येष्ठ
संपाादक कुमार केतकर हे व्याख्यानमालेचे
तिसरे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून ओळख असणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राची देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९६१ मध्ये स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेले हे कार्यालय केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
कुमार केतकर यांच्या विषयी
श्री केतकर यांनी मुंबई
विद्यापीठातून बीए ची पदवी संपादन केली. पत्रकारिता व्यवसाय स्वीकारून त्यांनी
कार्याला सुरुवात केली. दैनिक महाराष्ट्र टाईम्स आणि दैनिक लोकससत्ता या
वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. केंद्र सरकारने २०१०
मध्ये त्यांना पद्मश्री हा मानाचा नागरी
पुरस्कार देवून सन्मानित केले. ‘ज्वालामुखीच्या
तोंडावर’, ‘कथा स्वातंत्र्याची’, ‘विश्वामित्राचे जग’, ‘बदलते विश्व’, ‘त्रिकाल
वेद’ आणि ‘ओसरलेले वादळ’ ही त्यांची प्रसिध्द पुस्तके आहेत.
श्री.
केतकर यांनी अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षाच्या ८ निवडणुकांचे वार्तांकन केले आहे.
तसेच रशियाचे विभाजन, जर्मनीचे एकीकरण, हाँगकाँगचे एकीकरण या विषयांचे त्यांनी
वार्तांकन केले आहे.
रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
होणार
रविवारी
21 मार्च 2021 रोजी दुपारी
12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब
चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे
आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर
हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया
ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.५० /दिनांक १८.०३.२०२१
No comments:
Post a Comment