Thursday, 1 April 2021

सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 


नवी दिल्ली, 1 एप्रिल :  सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे केली.

आज उच्च व तंत्रज्ञान मंत्री श्री सामंत यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री धोत्रे यांच्या निवासस्थानी स्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान राज्यातील उच्च व तंत्रज्ञान शिक्षणाविषयी  चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.  याबैठकीत सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाला देण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री श्री धोत्रे यांनी याविषयावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) चे केंद्र कोकणातील जिल्ह्यांमध्येही असावे, अशी मागणी श्री सामंत यांनी श्री धोत्रे यांना केली. नीटची परिक्षा देण्‍यासाठी कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवळच्या मोठया शहरांमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांचा वेळ जातो. नीटचे केंद्र जवळच्या जिल्ह्यात असल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. त्यासाठी कोकणातील जिल्ह्यांमध्येच केंद्र देण्यात यावे, अशी मागणी श्री सामंत यांनी श्री धोत्रे यांना केली आणि त्या संदर्भात निवेदन दिले. यासह राज्यामधील महाविद्यालयातील पायाभुत सुविधांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

 

कोकणातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांविषयी केंद्रीय भुपृष्ठ मंत्री श्री गडकरी यांच्याशी चर्चा

 

 कोकणातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांविषयी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री या नात्याने आज  श्री सामंत यांनी केंद्रीय भुपृष्ठ व परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी महामर्गाची कामे जलद गतीने पुर्ण व्हावी, अशी मागणी त्यांनी

केली. या मार्गाचे कंत्राट सात-आठ वर्षापुर्वी काढूनही काम बंद होते. त्याचा पाठपुरावा करून या कामाची सुरूवात झाली आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आले असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली. 

No comments:

Post a Comment