नवी दिल्ली दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आज महाराष्ट्र सदन
व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर
मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले.
यासह कस्तुरबा
गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती
पुतळयास अभिवादन केले. यावेळी सहायक
निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, सहायक
लेखा अधिकारी निलेश केदारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या
प्रतिमेस व पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या
माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह कार्यालयात उपस्थित अधिकारी व
कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रयत्नातून नागरीकांना भारतीयत्वाची मिळालेली ओळख आणि देशात झालेला सकारात्मक बदल
यावर श्रीमती निमसरकर यांनी याप्रसंगी प्रकाश टाकला.
No comments:
Post a Comment