नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे हे 14 एप्रिल 2021 रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज परिवर्तनाची दिशा’ या विषयावर 27 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. 14 एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सत्तावीसाव्या दिवशी अर्जुन डांगळे हे सकाळी 11 वाजता विचार मांडणार आहेत.
अर्जुन डांगळे यांच्या विषयी
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक मराठी साहित्यावर प्रभुत्व असलेले आणि गेली पाच दशके महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमध्ये अर्जुन डांगळे यांनी सहभाग घेतला आहे. कवी, इतिहासाचा विद्वान वाचक आणि समाज सुधारणेच्या चळवळीचा संवेनदशील माणूस म्हणून श्री डांगळे यांची ओळख आहे. त्यांनी केवळ आंबेडकरी साहित्य चळवळीलाच हातभार लावला नाही तर पिढयानपिढया लिहण्यासाठी इच्छुक असणा-यांनाही मार्गदर्शन केले. राज्यघटनेत अपेक्षित असलेल्या सामाजिक समतेसाठी ते संघर्षरत आहेत. मराठी साहित्य, समाज सुधारणेच्या चळवळीमधील त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे.
‘छावणी हलते आहे…’ या कवितासंग्रहासह ‘ही बांधावरची मानस’ हा लघुकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘निळे अधोरेखित’ हे लेख संग्रह आहेत. ‘मैदानातील माणसे’, ‘कार्यकारणभाव :समाज आणि साहित्य..... साहित्यिक टिका’, ‘दलित पँथरचा इतिहास’ हे आणखी काही पुस्तके श्री डांगळे यांनी लिहीलेली आहेत.
काही पुस्तकांचे संपादनही श्री डांगळे यांनी केले आहे. यामध्ये ‘दलित साहित्य : एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवेदक वाड्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड – काळ आणि कर्तुत्व’, ‘विषयुक्त भाकर : दलित साहित्याचे काव्यशास्त्र’, ‘प्रबुध्द भारत नियतकालिक’ ही पुस्तके आहेत.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
मंगळवार, 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/
No comments:
Post a Comment