नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिध्द विचारवंत, नाटककार व कादंबरीकार संजय सोनवणी हे ५ एप्रिल २०२१ रोजी ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास’ या विषयावर अठरावे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. ५ एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या अठराव्या दिवशी संजय सोनवणी हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.
सं
मराठीतील महत्वाचे कादंबरीकार, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक म्हणून संजय सोनवणी यांची ख्याती आहे. वयाच्या ११ व्या वर्षांपासूनस त्यांनी लिखाणास सुरुवात केली. "फितुरी" हे नाटक आणि १६ व्या वर्षी त्यांनी ‘नरभक्षकांच्या बेटावर’ पहिली बालकादंबरी लिहिली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्वाच्या मासिकांतुनही प्रसिद्ध होत असत. "प्रवासी" हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. राजकीय थरार हा कादंबरीप्रकार त्यांनी मराठीत आणला. त्यांनी लिहीलेल्या "मृत्युरेखा", "रक्त हिटलरचे", ‘बीजींगच्या वाटेवर’ आदि कादंब-या गाजल्या. इंग्रजीतही अनुवादित होवून त्या जगभर गेल्या. ‘क्लिओपात्रा’ या ऐतिहासिक कादंबरीने त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली.
कादंबरीलेखनात त्यांनी अनेक प्रयोग केले. कल्की, कुशाण, ओडिसी, यशोवर्मनसारख्या तत्वचिंतनात्मक कादंब-यांपासून "...आणि पानिपत" सारख्या समाजैतिहासिक कादंब-याही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या इंग्रजी कादंब-या भारताव्यतिरिक्तच्या जगातील २८ प्रमुख विद्यापीठांत संशोधनासाठी वापरल्या जातात. त्यांचा "नीतिशास्त्र" हा नैतिक समस्यांबद्दलचा, आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेल्या चिंतनपर ग्रंथ व "अवकाशताण सिद्धांत व विश्व निर्मिती" हा विश्वनिर्मितीचा स्वतंत्र सिद्धांत मांडणाी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आठ कादंब-या इंग्रजीतही अनुवादित होऊन प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर "द अवेकनिंग" सारख्या स्वतंत्र इंग्रजीतही कादंब-याही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या "पर्जन्य सुक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबध्द करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा गाजली आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
सोमवार, 5 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/
No comments:
Post a Comment