Monday, 12 April 2021

 


महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा काल आज आणि उद्याया विषयावर

डॉ.निलम गोऱ्हे यांचे व्याख्यान

नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या 13 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा काल आज आणि उद्या या विषयावर 26 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु झाली आहे. 13  एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सव्वीसाव्या दिवशी उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे या सकाळी 11 वाजता विचार मांडणार आहेत.

डॉ. निलम गोऱ्हे  यांच्या विषयी

वर्तमानात महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि महिलांविषयक हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या डॉ. निलम गोऱ्हे या महाराष्ट्रातील तळागळातील जनतेला सुपरिचित असे नाव आहे. डॉ. गोऱ्हे यांनी 1987 पासून सार्वजनिक क्षेत्रात काम सुरू केले. सामाजिक, राजकीय क्षेत्राात काम तसेच याच विषयांवर विविध दैनिकात, मासिकात लिखाण केले. पंचायत राज, महिला विकास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार, याविषयांवर जनजागृती करणारे जवळपास 500 पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी आजवर दिलेली आहेत.

            डॉ. निलम गोऱ्हे या स्त्री आधार केंद्र व क्रांतीकारी माहिला संघटना या संस्थांच्या त्या संस्थाप‍िका आहेत. 1993-95 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या राहील्या आहेत. 1992 ते 98 या कालावधीत  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महिला व्यासपीठाच्या निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले.

 

राज्यातील हजारो कुटुंबीयांना व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटाची स्थापना त्यांच्या पुढाकराने झालेली आहे. स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रिय सहकार्य डॉ. गोऱ्हे या करतात.

डॉ. गोऱ्हे यांना लिहीण्याचा आणि वाचण्याचा व्यासंग आहे. त्यांची अनेक पुस्तके आहेत. या पुस्तकांमधुनही त्यांनी जनजागृतीचे कार्य केलेले आहे.  

           

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

        मंगळवार, 13 एप्रिल 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे 

मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,

 हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍

इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईलhttps://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच

 https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

No comments:

Post a Comment