नवी दिल्ली, दि. ५ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत वरिष्ठ पत्रकार आणि लेखक सचिन परब हे उद्या ६ एप्रिल २०२१ रोजी ‘प्रबोधनकार ठाकरे-महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत’ या विषयावर १९ वे पुष्प गुंफणार आहेत.
सचिन
परब यांच्या विषयी
मराठीतील प्रसिध्द पत्रकार, लेखक आणि
ब्लॉगर म्हणून सचिन परब यांची ओळख आहे. दै.महाराष्ट्र टाईम्सचे मेट्रो एडिटर,
दै.नवशक्तीचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मी मराठी वृत्त
वाहिनीचे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले आहे. ‘माझं आभाळ’ हा त्यांचा ब्लॉग प्रसिध्द आहे.
वारकरी संप्रदायाचे तसेच संत साहित्याचे नव्या
पिढीतील अभ्यासक म्हणूनही ते परिचित आहेत. संतपरंपेरच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा
मागोवा घेणा-या ‘रिंगण’ या वार्षिक
वेशषांकाचे संपादन त्यांनी केले आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
मंगळवार, 6 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या
अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब
चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ
घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान
परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया
ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता
येणार आहे.
००००
िरितेश भुयार /वृत्त वि. क्र.८७ /दिनांक
५.०४.२०२१
No comments:
Post a Comment