महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्षआणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. ४ एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सतराव्या दिवशी ज्ञानेश महाराव हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.
ज्ञानेश महाराव यांच्या विषयी
ज्ञानेश महाराव हे साप्ताहिक चित्रलेखाचे
संपादक आहेत. १९८५ पासून पत्रकारिता ते क्षेत्रात
कार्यरत आहेत.१९८५ ते १९८९ दरम्यान त्यांनी ‘साप्ताहिक विवेक’चे
सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले. १९८९
पासून ते ‘साप्ताहिक चित्रलेखा’चे संपादक म्हणून कार्यरत आहेत. चौथ्या राज्यस्तरीय समातावादी साहित्य संमेलनाचे
अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
‘उत्तरक्रिया’, ‘उजळावी ज्ञानाची दिवाळी’, ‘उठावा
महाराष्ट्र देश’ आदी २० पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली
आहेत. ‘जिंकू या दाही
दिशा’, ‘संगीत घालीन लोटांगण’ आदी
नाटके त्यांनी लिहीली आहेत. ‘कृषीवलकार प्रभाकर पाटील पुरस्कार’, ‘माधवराव बागल पुरस्कार’, ‘आचार्य
अत्रे स्मृती पुरस्कार’ , ‘दीनमित्र
मुकुंदराव पाटील पुरस्कार’ आदि पुरस्कारांनी त्यांना
गौरविण्यात आले आहे.
रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान
प्रसारण
रविवार, 4 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic
००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.८२ /दिनांक २.०४.२०२१
No comments:
Post a Comment