नवी दिल्ली, दि. १ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या ३ एप्रिल २०२१ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’सुरु आहे. शनिवार ३ एप्रिल रोजी श्रीकांत देशमुख हे सकाळी ११.००वाजता व्याख्यान मालेचे १६ वे पुष्प गुंफणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित या विशेष व्याख्यानातून शिवरायांच्या वैविद्यपूर्ण व्यक्तीमत्वाचे पैलु उलगडणार आहेत.सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
श्रीकांत देशमुख यांच्या विषयी
श्रीकांत देशमुख हे महाराष्ट्र शासनात उच्चश्रेणी अधिकारी असून ते एक
उत्तम साहित्यिकही आहेत. ‘बळीवंत’,‘आषाढमाती’ आणि ‘बोलावे ते आम्ही’ हे त्यांचे कवितासंग्रह
प्रकाशितआहेत. ‘बोलावे ते आम्ही’ या
कविता संग्रहास २०१७ मध्ये साहित्यक्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार
मिळाला आहे.
‘पडझड वा-याच्या भिंती’,‘साखर कारखानदारीतले दादा’
ही त्यांची ललित गद्याची पुस्तके
प्रसिध्द आहेत.‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’ आणि ‘कुळवाडी भूषण शिवराय’ ही
त्यांची वैचारीक पुस्तके प्रकाशित आहेत. ‘पिढीजात’ ही त्यांची कांदबरी आणि ‘नली’
हे नाटकही प्रसिध्द आहे. ‘महानोरांची कविता’,‘समकालीन साहित्य विचार, ‘डॉ. नागनाथ कोत्तापल्ले गौरवग्रंथ’ आणि ‘भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुनरावलोकन’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे.
श्रीकांत देशमुख यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रशासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार,राज्य शासनाचा केशवसूत पुरस्कार,अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
शनिवारी समाज माध्यमांहून व्याख्यान
प्रसारण
शनिवार,3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून
व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ
घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान
परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडलhttps://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी
ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया
ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता
येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic
००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.८१/दिनांक २.०४.२०२१
No comments:
Post a Comment