नवी दिल्ली, दि. 7 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र
हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकसत्ता चे संपादक
गिरीश कुबेर हे उद्या 8 एप्रिल 2021 रोजी
‘महाराष्ट्राचा
तर्कवाद’ या विषयावर व्याख्यानमालेचे
21 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले
60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ‘महाराष्ट्र हीरक
महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे.
गुरुवार 8 एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या एकविसाव्या दिवशी गिरीश कुबेर हे दुपारी
4:00 वाजता विचार
मांडणार आहेत.
गिरीश कुबेर यांच्या विषयी
गिरीश कुबेर
यांची पत्रकार म्हणून सुरूवात वर्ष 1985-86 च्या काळातील आहे. त्यांनी दैनिक. द
गार्डीयन या लंडनमधून निघणा-या आवृत्तीसाठी काही काळ काम केले आहे. द इकोनॉमीक
टाइम्स या दैनिकात राजकीय संपादक म्हणुनही काम केलेआहे.
कॅम्ब्रिज एनर्जी रिसर्च
असोसियेटेड (केरा वीक) या आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेत भारतातील एकमेव पत्रकार
म्हणून सहभागी होण्याची संधी श्री कुबेर यांना मिळाली आहे.
‘द टाटा’, ‘हा तेल
नावाचा इतिहास आहे’, ‘एका तेलियाने’, ‘अर्धमयुध्द’, ‘युध्द जीवाचे’, ‘टाटायन’, ‘लोकसत्ता अग्रलेख’, ‘पुतिन’ अशी एकापेक्षा एक वेगवेगळया विषयाला स्पर्शणारी
पुस्तके श्री कुबेर यांनी लिहीलेली आहेत.
यासह अनेक साहित्यिक आणि सामाजिक विषयांवर विविध मासिक आणि प्रकाशनांमध्ये ते लिहीत असतात.
समाज माध्यमांहून व्याख्यान
प्रसारण
बुधवार, 8 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या
अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब
चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ
घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान
परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक
प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
आमच्या ट्विटर
हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment