Tuesday, 6 April 2021

“महाराष्ट्र आणि महात्मा गांधी” विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान


 

महाराष्ट्र आणि महात्मा गांधी  विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान

 

नवी दिल्ली, दि. ६ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत  महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे उद्या ७ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या विषयावर  व्याख्यानमालेचे २० वे पुष्प गुंफणार आहेत.

             महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु झाली आहे. ७ एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या विसाव्या दिवशी तुषार गांधी हे दुपारी ४.०० वाजता  विचार मांडणार आहेत.  

                                              तुषार गांधी  यांच्या विषयी

        जगाला महात्मा गांधीजींच्या शिकवणीची आठवण करून देणारे विचारवंत म्हणून तुषार गांधी  यांची ओळख आहे. त्यांनी ५ वर्ष संशोधन करून लेट्स कील गांधी हे पुस्तक लिहीले या पुस्तकाने विक्रीचा उचांक गाठला.

  महात्मा गांधी फाऊंडेशन (वडोदरा) आणि लोकसेवा ट्रस्ट(मुंबई) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. ऑस्ट्रेलियन इंडियन रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. सीएसआयआर आणि आयएसपी या आंतरशासकीय संस्थांनी आरंभिलेल्या कुपोषण विषयक कार्याचे सदिच्छादूत म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

                                       समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण    

          बुधवार, 7 एप्रिल 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.    

                                 

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.८९  /दिनांक  .०४.२०२१

 


No comments:

Post a Comment