Tuesday, 4 May 2021

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांचे व्याख्यान छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य आणि सद्यस्थिती या विषयावर गुंफणार 41 वे पुष्प


 

नवी दिल्ली दि. 4 मे: राजर्षी शाहू जीवन चरित्राच्या अभ्यासक तथा इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार  या उद्या दिनांक 5 मे रोजी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य आणि सद्यस्थिती या विषयावर 41 वे पुष्प गुंफणार आहेत.

 महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे रोजी 61 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने परिचय केंद्राने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु केली आहे. या व्याख्यानमालेत ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता इतिहास संशोधक  डॉ. मंजुश्री पवार आपले विचार मांडणार आहेत.

                                                          डॉ. मंजुश्री पवार यांच्याविषयी...

डॉ. मंजुश्री पवार या इतिहास संशोधक असून राजर्षी  शाहू महाराज यांच्या जीवन चरित्राचे अनेक पैलु उलगडण्याचे कार्य त्या मागील कित्येक वर्षापासून  करीत आहेत.  Rajshri shahu maharaj and British Paramount power in India  या विषयावर त्यांनी पीचडी करताना  त्यांना सुवर्ण पदक मिळालेआहे.  इतिहास संशोधन करीत त्यात सखोल ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी भारतीय अभिलेखागार , नवी दिल्ली येथून विशेष अभ्यासक्रम पुर्ण केला केलेला आहे. गेली वीस वर्ष महाराष्ट्र इतिहास प्रबोधनी या इतिहास संशोधन तसेच प्रबोधन करणाऱ्या संस्थेत डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सोबत संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.  राजर्षी शाहु महाराज यांचे स्वातंत्र्य, सामाजिक चळवळीतील अभूतपूर्व योगदान लोकांपर्यत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत. 

 

आतापर्यत 14 भारतीय भाषेत आणि 4 परदेशी भाषेत राजर्षी शाहु महाराजांचे चरित्र अनुवाद करण्याच्या कार्यात त्यांनी सह संपादिका म्हणून काम केले  आहे. त्यांची राजर्षी शाहू ॲड द ब्रिटीश पॅरामाऊंट पॉवर इन इंडिया, भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, मराठी सत्तेचा उदय, मराठ्यांची राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था, वेध इतिहासाचा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तर राजर्षी शाहू अनुवाद प्रकल्प, विद्यार्थिनी चळवळी पुढील आव्हाने, राजर्षी शाहू स्मारक पंचखंडात्मक ग्रंथ या पुस्तकांचे त्यांनी सहसंपादन केले आहे. त्यांना आतापर्यत कोल्हापूर विद्यापीठाचा पीएचडी प्रबंधासाठी अवॉर्ड ऑफ एक्सलंसपुरस्कार व कै.नर्मदा जाधव स्मृती पुरस्कार मिळाला आहे. तसेच बळीराजा पुरस्कार व झी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण 

 बुधवार दि. 5 मे 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.

थेट प्रसारण येथे पहा

 

ट्विटर

https://twitter.com/MahaGovtMic  

https://twitter.com/micnewdelhi   

https://twitter.com/MahaMicHindi   

यू ट्यूब

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi     

फेसबुक

https://facebook.com/micnewdelhi   

कू(Koo)

https://www.kooapp.com/profile/micdelhi

 

                                       ***************************

No comments:

Post a Comment