Saturday, 5 June 2021

6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनी ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ विषयावर एयर मार्शल अजित भोसले यांचे व्याख्यान


 

नवी दिल्ली, दि. 5 : 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनी एयर मार्शल अजित भोसले हे ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ या विषयावर उद्या रविवारी दिनांक 6 जुन 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 44 वे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र शासन शिव राज्याभिषेक दिन हा दिवस 'शिव स्वराज्य दिन' म्हणून साजरा करीत आहे, या दिनाचे औचित्य साधून हे व्याख्यान आयोजित होत आहे.

 महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. याव्याख्यानमालेत 6 जून रोजी सकाळी 11 वाजता एयर मार्शल अजित भोसले हे ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

एयर मार्शल अजित भोसले यांच्या विषयी

 एयर मार्शल अजित भोसले यांनी 40 वर्षे वायुदलात सेवा दिली आहे. सध्या भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत. नाशिक भोसला मिलटरी शाळेतुन शालेय शिक्षण केले. पुढे पूण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतुन उत्तीर्ण होऊन वायुसेनामध्ये रूजु झाले. त्यांनी श्रीलंकामध्ये शांती सेना मोहिमेमध्ये सहभागी घेतला. यासह कारगील मोहिमेत सहभागी होते. अर्मेनीयामधील आपत्ती निवारण मोहिमेचे नेतृत्व केले होते. मध्य पूर्व, रशिया, उझबेकिस्तान, पोलंड, फ्रान्स, इजिप्त, ग्रीस, मॉरिशस आणि सायप्रस मधील शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कॅडेटसंना प्रशक्षित केलेले आहे.

            एयर मार्शल भोसले हे राजधीनीतील राष्ट्रीय वॉर मेमोरियलचे मुख्य समन्वयक होते. यासह भारतीय संरक्षण विद्यापीठामध्ये मोलाची भुमिका निभावली आहे .

                           समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

 रविवार, दिनांक 6 जून 2021 रोजी सकाळी 11  वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.  हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.

थेटप्रसारण येथे पहा

ट्विटर

https://twitter.com/MahaGovtMic  

 https://twitter.com/micnewdelhi 

 https://twitter.com/MahaMicHindi 

 यू ट्यूब

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi 

 फेसबुक

https://facebook.com/micnewdelhi 

 कू(Koo)

https://www.kooapp.com/profile/micdelhi

 

********************

 

 

No comments:

Post a Comment