नवी
दिल्ली दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती आज
महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी अहिल्यादेवी
होळकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासह कस्तुरबा गांधी मार्गावरील
नवीन महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयासही श्री गोयल
यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या दोन्ही
कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील
अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनीही यावेळी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात अहिल्यादेवी
होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर
यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.
No comments:
Post a Comment