महाराष्ट्रातील
8 अग्निशमन
अधिका-यांना अग्निशमनशौर्यपदक जाहीर
नवी दिल्ली, दि. 14 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी
महाराष्ट्रातील 8 अग्निशमन
अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर झाले
आहेत.
स्वातंत्र्यदिनाचे
औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज
उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या ८६ अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध
श्रेणींमध्ये अग्निशम पदक जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.
‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर महाराष्ट्रातील 8 अधिकारी –कर्मचारी खालील प्रमाणे
1. श्री. प्रभात सूरजलाल रहांगडाले, डी.एम.सी आणि संचालक (अ.का.) महाराष्ट्र अग्निशमन सेवा.
2. श्री. हेमंत दत्तात्रय परब, मुख्य अग्निशमन अधिकारी.
3. श्री. आत्माराम जगदंबाप्रसाद मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी.
4.श्री. कृष्णांत रामचंद्र यादव, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी.
5. श्री. बाळासाहेब बन्सी नेटके, सहाय्यक स्टेशन अधिकारी.
6. श्री. पंकज अशोक पवार, फायरमन.
7. श्री. संदीप धर्मराज आसेकर, फायरमन.
8. श्री. राजेंद्र बाळकृष्ण राजम, फायरमन.
No comments:
Post a Comment