नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक
महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर हे गुरूवारी, 12 ऑगस्ट 2021
रोजी ‘पुरोगामी
महाराष्ट्राचे भविष्य’ विषयावर 56 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र
राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी
वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक
महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत
12 ऑगस्ट रोजी राजू परूळेकर हे दुपारी ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
राजू परूळेकर यांच्याविषयी
ज्येष्ठ
पत्रकार, पटकथाकार कवी, लेखक, संशोधन, राजकीय विश्लेषक म्हणुन राजू परूळेकर यांची ओळख महाराष्ट्र, भारतसह
आंतरराष्ट्रीय स्तरावरही आहे. त्यांचे विश्लेषनात्मक अनेक लेख अतंरराष्ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित झालेले आहेत.
प्रिया
तेडूंलकर निर्मित ‘जिम्मेदार
कौन’ या टॉक शो मध्ये विश्लेषक म्हणुन राजू परूळेकर होते. विजय
तेंडूलकर सोबत त्यांनी विविध पटकथा लिहीलेल्या आहेत. यासह कला, संस्कृती, फॅशनवर आधारित ‘प्लॅटिनियम’ या मासिकाचे मुख्य संपादक म्हणुन त्यांनी काम पाहिलेले आहे.
श्री परूळेकर यांनी दुरदर्शनवर येणा-या ‘संवाद’ यो
कार्यक्रमाचे 3500 एपिसोडचे यशस्वीपणे सुत्रसंचालन केले. श्री. परूळेकर लिखित ‘थॉट्स आर
पेरीलियस’ (Thoughts are perilous) या नॉन-फिक्शन
पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
प्राप्त झालेला आहे. श्री. परूळेकर हे नवी दिल्ली येथे 2015 ला झालेल्या प्रथम ‘एशिया पीस फोरम’ चे समन्वयक होते.
‘महाराष्ट्र टाईम्स सन्मान’, ‘इंद्रधनुष्य
जीवनोमेन्ष’, पुरस्कार, रेडीयो एण्ड
टेलीविजन एडवरटाइजिंग एसोसियेशनच्यावतीने श्री परूळेकर यांना पुरस्कार प्राप्त
झालेला आहे.
गुरूवारी समाज माध्यमांहून व्याख्यानाचे प्रसारण
गुरूवारी,
12 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत
ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित
होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी
ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे.
तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
No comments:
Post a Comment