Tuesday, 3 August 2021

‘औद्योगिक मानसशास्त्र’ या विषयावर मानसशास्त्रज्ञ डॉ.वृषाली राऊत यांचे व्याख्यान



नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत या उद्या ४ ऑगस्ट २०२१ रोजी औद्योगिक मानसशास्त्र या विषयावर ४८ वे पुष्प गुंफणार आहेत.

             महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. ४ ऑगस्ट रोजी डॉ. वृषाली राऊत  या दुपारी ४ वाजता व्याख्यानमालेत विचार मांडणार आहेत.  

                                 डॉ. वृषाली राऊत यांच्या विषयी 

       डॉ. वृषाली राऊत या पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठात मानसशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कर्मचारी कल्याण, शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच सामाजिक विषयांवर त्यांचे सातत्यपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत.  

            औद्योगिक मानसशास्त्र विषयात त्यांनी पीएचडी संपादन केली असून त्यांच्या या संशोधनकार्यावर फिलींग ब्लू हा लघुपट तयार झाला आहे. डॉ. राऊत या उत्तम  ब्लॉगर म्हणूनही प्रसिध्द आहेत. अक्षरनामा या फिचर पोर्टलवर त्या सातत्याने लिहीतात.विविध महाविद्यालये व संस्थांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.       

                                                बुधवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण    

          बुधवार,  ऑगस्ट 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

          हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.    

                                 

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.१५८  /दिनांक  ०३.०७.२०२१ 


 

No comments:

Post a Comment