Friday, 6 August 2021

‘संविधान आणि जागरुकता’ या विषयावर माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांचे व्याख्यान



नवी दिल्ली, दि. ६ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे हे शनिवार, ७ ऑगस्ट २०२१ रोजी संविधान आणि जागरुकता या विषयावर ५१ वे पुष्प गुंफणार आहेत.  

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. व्याख्यानमालेत ७ ऑगस्ट रोजी  ई.झेड. खोब्रागडे  हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.  

                                ई.झेड. खोब्रागडे यांच्या विषयी  

            श्री. खोब्रागडे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून त्यांनी नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर,पुणे, मुंबई, ठाणे आदी ठिकाणी विविध महत्वाच्या पदांवर कार्य केले आहे. नागपूर ‍जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना २००५ मध्ये त्यांनी संविधान ओळख उपक्रम सुरु केला. सेवानिवृत्तीनंतर २०१२ मध्ये श्री खोब्रागडे यांनी संविधान जागृतीसाठी संविधान फाऊंडेशनची स्थापना केली.

            त्यांच्या पुढाकाराने २००१ मध्ये महाराष्ट्र ऑफिसर फोरम ची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने मी आयएएस बोलतोयहा विशेष कार्यक्रम त्यांनी राबविला.

            श्री खोब्रागडे यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत. प्रशासकीय स्वानुभवांवर आधारित आणखी एक पाऊलहे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकास विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कारही  प्राप्त झाला आहे. यासोबतच प्रशासनातले समाजशास्त्र आणि आपले संविधान ही पुस्तकेही प्रसिध्द आहेत.

            संविधान, प्रशासन, शासनाच्या विविध विकास योजनांविषयी श्री खोब्रागडे सातत्याने विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करतात.माणूस व्यवस्था, प्रत्यंतर आणि जागर या त्यांच्या विशेष लेखमाला  आघाडीच्या वृत्तपत्रांमधून  प्रकाशित झाल्या आहेत.              

                             शनिवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण   

          शनिवार,  ऑगस्ट 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

          हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.    

                                 

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

वृत्त वि. क्र.१६२  /दिनांक  ६.०८.२०२१ 

 

No comments:

Post a Comment