नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत
ज्येष्ठ लेखक, संपादक अरूण खोरे हे उद्या 6 ऑगस्ट 2021 रोजी ‘मराठी दलित साहित्याचे
भारतीय साहित्याला योगदान’ या विषयावर 50
वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक
महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक
महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. 6 ऑगस्ट
रोजी अरूण खोरे हे दुपारी 4 वाजता व्याख्यानमालेत विचार मांडणार आहेत.
अरूण खोरे यांच्याविषयी
लेखक तसेच संपादक अरूण खोरे
यांनी दै. सकाळ, दै. लोकसत्ता, दै. लोकमत, दै पुढारी, दै. प्रभातमध्ये कार्य
केलेले आहे. समाजिक प्रश्न, समाजातील वंचित, अपंग, कष्टकरी, महिलांच्या प्रश्नांना
वाचा फोडण्याचे काम श्री खोरे यांनी लेखणीच्या माध्यमातून केलेले आहे.
‘पोरके दिवस’, ‘दोन युरोप’, ‘इंदिरा
प्रियदर्शनी’, ‘मुद्रित माध्यमांसाठी
लेखन कौशल्ये’ ही
पुस्तके अरूण खोरे यांनी लिहीलेली
आहेत.
गांधीजींची पुनर्भेट, दिव्यांग
आणि आपण, महाड सत्याग्रह, 90 वे स्मरण वर्ष विशेषांक, महाराष्ट्र – विकासाचे नवे
प्रवाह, लोकशाहीला बळ देणा-या विचारधारा विशेषांक , दलित उद्योजकता विशेषांक,
गांधीजींचे प्रेरणादायी विचार (मराठी आणि इंग्रजी भाषेत), कृतीशील परिवर्तनवादी
शरद पवार, दलित साहित्याच्या शोधात, लोकसभा निवडणूक विशेषांक 2019 या पुस्तकांचे
तसेच विशेषांकाचे संपादन केलेले आहे.
शुक्रवारी,
6 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत
ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत
होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी
ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी
ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक
मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर
पाहता येणार आहे.
No comments:
Post a Comment