Friday 1 October 2021

‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण


 

नवी दिल्ली, 1 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतींच्या औचित्याने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने उद्या शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी गांधीजींचे पणतू ख्यातनाम विचारवंत तुषार गांधी यांच्या ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.
तुषार गांधी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेत (ऑनलाईन) 7 एप्रिल 2021 रोजी ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावर 20 वे पुष्प गुंफले होते. याच व्याख्यानाचे उद्या सकाळी 11 वाजता पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल आणि फेसबुकहून व्याख्यानाचे पुन: प्रसारण होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,
हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍
इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI ,
फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि
फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००

वि.वृ.क्र.206 /दि.01.10.2021

No comments:

Post a Comment