नवी दिल्ली दि. 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त व आयुक्त (गुंतवणुक व राजशिष्टाचार) डॉ.निधी पांडे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त डॉ. निरूमपा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश डपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पं. नेहरू यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजु निमसरकार यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर /वृत विशेष क्र. 232 दि. 14. 11.2021
No comments:
Post a Comment